आरक्षणाबाबत सरकारचे बोटचेपे धोरण : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

आतापर्यंत राज्यात 57 ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार काही निर्णय घेईल असे वाटत आहे. कोपर्डीतील आरोपीला फाशीची शिक्षा यासह अन्य काही मागण्या मराठा समाजाच्या आहेत. आज सभागृहात आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आवाज उठविला. आज मुंबईतदेखील परिस्थिती काय झाली आहे आपण पाहत आहोत. सरकार फक्त गोंधळ घालत आहे.

मुंबई : मराठा समाजाचे मोर्चे शांततेने निघत आहेत. जग हे मोर्चे पाहत आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारने आता दिरंगाई देण्याचे काम सरकारने करू नये. सर्वच पक्ष पाठिंबा देत असताना आरक्षण देण्याचे काम कोठे आडत आहे, याबाबतची माहिती सरकारने दिली पाहिजे. आरक्षणाबाबत सरकारचे बोटचेपे धोरण दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले आहेत.

या मोर्चाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, की आतापर्यंत राज्यात 57 ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार काही निर्णय घेईल असे वाटत आहे. कोपर्डीतील आरोपीला फाशीची शिक्षा यासह अन्य काही मागण्या मराठा समाजाच्या आहेत. आज सभागृहात आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आवाज उठविला. आज मुंबईतदेखील परिस्थिती काय झाली आहे आपण पाहत आहोत. सरकार फक्त गोंधळ घालत आहे. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या सरकारच्या काळात आऱक्षण दिले होते. पण, न्यायालयात ते टिकले नाही. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही. सत्ताधारीच पक्ष सभागृह चालू देवू इच्छित नाही. मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार सहभागी होण्यासाठी गेले होते. पण, त्यांची हुर्यो उडविण्यात आली. या मोर्चाचा कोणलाही त्रास होत नाही.

सरकारची भूमिका प्रामाणिक नाही: राधाकृष्ण विखे पाटील
मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडू द्यायची नाही अशी सरकारची इच्छा आहे. आरक्षण देण्याच सरकारचे दायित्व आहे. सरकारने आजच सभागृहामध्ये आरक्षणाचा निर्णय जाहीर करायला हवा. गेल्या अडीच वर्षांपासून फोडण्याचे काम सरकार करत नाही. आरक्षण देण्याची सरकारची प्रामाणिक भूमिका नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.

Web Title: marathi news maratha kranti morcha marathainmumbai Ajit Pawar on Mumbai Morcha