आशिष शेलारांना मराठा मोर्चात धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानात प्रवेश करण्यापासून मोर्चेकऱ्यांनी रोखले, तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावरच ही घटना घडली. मात्र, आशिष शेलारांकडून अशी घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई - मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर आलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आले. तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

आम्ही आमचं लढू म्हणत मराठा बांधवांनी राजकीय नेत्यांना मराठा क्रांती मोर्चातून हुसकावून लावण्यात आले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानात प्रवेश करण्यापासून मोर्चेकऱ्यांनी रोखले, तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावरच ही घटना घडली. मात्र, आशिष शेलारांकडून अशी घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.

मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM