मुंबईत लाखो मराठ्यांची गर्जना

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

भायखळ्यातील राजमाता जिजामाता उद्यानापासून निघालेला हा मोर्चाचे वर्णन केवळ अभूतपूर्व या शब्दात करता येईल. भायखळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचे शेवटचे टोक दिसत नाही, इतका जनसागर मोर्चाला लोटला आहे.

मुंबई : अफाट जनसागराच्या साक्षीने मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत अत्यंत शिस्तबद्धरित्या आज (बुधवार) सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली आहे. मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले असूनही रुग्णवाहिकेला तात्काळ वाट करुन देण्यात आली.

भायखळ्यातील राजमाता जिजामाता उद्यानापासून निघालेला हा मोर्चाचे वर्णन केवळ अभूतपूर्व या शब्दात करता येईल. भायखळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचे शेवटचे टोक दिसत नाही, इतका जनसागर मोर्चाला लोटला आहे. मोर्चाच्या मार्गावरील मुंबई स्तब्ध होऊन हा विराट महामोर्चा अनुभवत आहे. कित्येक किलोमीटरच्या रस्त्यावर केवळ भगव्याचे अस्तित्व दिसते आहे. 

मोर्चाच्या अग्रभागी तरूणी आहेत. या तरूणी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन सरकारला सादर करतील. या आधीच्या सर्वच 57 मोर्चांमध्ये याच पद्धतीने मोर्चेकऱयांनी निवेदन सादर केले होते. 

मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय मुंबईतील डबेवाल्यांनी घेतला आहे. आज मुंबईत डबेवाले डबे पोहोचविण्याचे काम करणार नाहीत, असे डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. सर्व मराठी वाहिन्या आणि देशभरातील प्रमुख टीव्ही वाहिन्यांनी या मोर्चाचे लाईव्ह कव्हरेज प्रसारित केले आहे.

राजकीय नेत्यांचा सहभाग 
मोर्चाच्या आचारसंहितेप्रमाणे राजकीय नेत्यांचा मोर्चात सहभाग असेल; मात्र मोर्चाच्या अग्रभागी नसेल. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सर्वपक्षीय आमदार मुंबईतच आहेत. त्यामुळे या अखेरच्या मोर्चात सर्वपक्षीय राजकीय नेते सहभागी होतील, असे मानले जाते. या मोर्चाला उद्देशून पाच युवतींची भाषणे आझाद मैदानावर होतील. त्यानंतर या मुली शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विधानभवनात जातील. 

राणे होणार दूत 
सर्वपक्षीय मराठा आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांचे उत्तर घेऊन मोर्चासमोर जाहीर करतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. असा निर्णय मराठा मोर्चाचे सर्व आयोजक आणि मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठक झाला. शिवाजी मंदिरात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. 

महाराष्ट्र

नाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांची आज दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुमारे दीड...

01.39 AM

मुंबई - राज्यात 2017-18 चा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास बुधवारी मंत्री समितीच्या बैठकीत मान्यता...

01.09 AM

मुंबई - कैद्यांची संख्या वाढल्याने ठाणे मध्यवर्ती तुरुंगात त्यांची दाटी झाली आहे. नव्याने येणाऱ्या कैद्यांना तुरुंगात घेतले...

01.09 AM