मराठा क्रांती मोर्चाची राज्यात जय्यत तयारी

File photo of Maratha Kranti Morcha
File photo of Maratha Kranti Morcha

मुंबई : राजधानी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरवात झाली आहे. कोल्हापूर, पुण्यासह सगळीकडून आज (मंगळवार) विशेष गाड्यांमधून मराठा बांधवांनी मुंबईला कूच केली आहे. 

देशातील सर्वांत मोठा मोर्चा असल्याने मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याची व्यवस्था केली आहे. 
 

मुंबईत मराठा मोर्चाचा 'फिव्हर'
मराठा क्रांती मोर्चाचा 'फिव्हर' मुंबईत जोर धरू लागला आहे. आज राज्यातील विविध मुस्लिम संघटनांनी मोर्चाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला. मुंबई वाहतूक पोलिसांनीही मोर्चा मार्ग, पार्किंग व वाहतुकीची यंत्रणा सुरळीत होईल, यासाठी कंबर कसली आहे. 

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील शाळांना बुधवारी सुटी
मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवार) दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.

सर्व जाति-धर्मांनी मराठा समाजाला पाठबळ द्यावे- राणे
आतापर्यंत महाराष्ट्रात होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये बहुतांश मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. त्यांनी इतर समाजांना आरक्षणाचा लाभ देताना संपूर्ण सहकार्य केले. त्याचप्रमाणे सर्व जाती-धर्मांच्या समाजाने मराठा समाजाला पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com