नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 जुलै 2017

मुंबई : राज्यातील महापालिका नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याच्या निर्णयास नगरविकास विभागाने शनिवारी मंजुरी दिली. नगरविकासाच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकास प्रतिमहिना 25 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईवगळता इतर वर्गवारीतील महापालिका नगरसेवकांच्या माधनात वाढ झाली आहे. 

या वाढलेल्या मानधनाचा आर्थिक भार त्या त्या महापालिकांच्या तिजोरीवर पडणार आहे. मानधनवाढीचा निर्णय नगरविकास विभागाकडे प्रलंबित होता. त्यावर आज शिक्‍कामोर्तब करण्यात आले. 

राज्यात महापालिकांचे वर्गीकरण चार विभागांत केले आहे. मुंबई महापालिका 'अ प्लस' वर्गवारीत मोडते. येथील नगरसेवकास प्रतिमहिना 15 हजार इतके मानधन होते. त्यात दहा हजार रुपये इतकी वाढ करून ते आता 25 हजार रुपये इतके केले आहे; तर 'अ' वर्गवारीत दोन महापालिकांचा समावेश होतो. या महापालिकांतील नगरसेवकांना पूर्वी साडेसात हजार रुपये इतके मानधन होते. ते वाढवून आता 20 हजार केले आहे. 'ब' वर्गातील महापालिकांची संख्या तीन असून, येथील नगरसेवकांना पूर्वी साडेसात हजार रुपये मिळत होते. आता 15 हजार रुपये मिळणार आहेत. 'क आणि ड' वर्गातील महापालिकांच्या नगरसेवकांस साडेसात हजारांवरून दहा हजार रुपये इतकी वाढ केली गेली आहे. 

मुंबई महापालिका सदस्यांचे 2008 मध्ये इतर मुंबई वगळून इतर महापालिका सदस्यांचे 2010 मध्ये यापूर्वी मानधन वाढवण्यात आले होते. महागाईचा विचार करून त्यानंतर या प्रमाणात मानधनात वाढ करण्यात आली. राज्यात 27 महापालिका आहेत. 

महापालिका 
नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी-निजामपूर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कूपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई- विरार

महाराष्ट्र

लोहारा : तीन मुलींसह आईचा मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. या चौघींचाही मृत्यू संशयास्पद असून, आत्महत्या की घातपात, याची चर्चा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017