ठाणे - पालघरमध्ये 11 नवीन शहरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील गर्दी लक्षात घेता विकासाचा बिंदू ठाणे-पालघरकडे सरकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 11 नवीन शहरे सिडको आणि रस्ते विकास मंडळ वसवणार आहे. समृद्धी महामार्गाच्या परिसरालगत ही नवी नगरे प्रस्तावित आहेत. 

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील गर्दी लक्षात घेता विकासाचा बिंदू ठाणे-पालघरकडे सरकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 11 नवीन शहरे सिडको आणि रस्ते विकास मंडळ वसवणार आहे. समृद्धी महामार्गाच्या परिसरालगत ही नवी नगरे प्रस्तावित आहेत. 

मुंबईजवळच्या भागाचा विकास करण्यासंदर्भातील आराखडा नुकताच नगरविकास विभागाने जाहीर केला आहे. राज्याचे नगरविकास सचिव नितीन करीर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाने या आराखड्यानुसार नवीन शहरांच्या विकासाचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार आसनगाव, बोईसर, केळवे आणि वाडा या प्रमुख शहरांची विकास केंद्रे म्हणून वाढ केली जाणार आहे. नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर या शहरांचा प्रत्यक्ष संपर्क असेल. या प्रस्तावित विकास केंद्रांवर सध्या काही ठिकाणी गावठाणे; तर काही भागात हरितपट्टा आहे. पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण न करता विकासाचे उद्दिष्ट साधण्याचे आव्हान हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना आहे. 

पालघर या नवनिर्मित जिल्ह्यासाठी तीन हजार 800 कोटींचा खर्च करून मुख्यालय उभारले जाते आहे. या मुख्यालयातील प्रशासकीय भवनाचे बांधकाम काही महिन्यांत पूर्ण होईल, असे सिडकोतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर पालघरमधील 440 हेक्‍टरवर उभ्या राहणाऱ्या या नवनगरातील 103 हेक्‍टर जमीन सरकारी कामांसाठी राखीव आहे; तसेच उर्वरित भूखंडावर गृहनिर्माण प्रकल्प आणि उद्योग केंद्रे अभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या परिसरात झालेला विकास यानिमित्ताने नव्या परिसरात पोहोचेल. खासगी आणि सरकारी उपक्रमांतर्गत या परिसराचा कायापालट करतानाच मुंबईत जागेअभावी खुंटलेला विकास आता नव्या परिसरात करण्यात येणार आहे. 

विकासासाठी अनुकूल वातावरण 
रेल्वे मार्ग, रस्त्यांचे जाळे, उत्तम हवामान आणि मुंबई परिसरातल्या कुशल मनुष्यबळामुळे ठाणे- पालघरमधील काही भाग विकसित होणे सहजशक्‍य आहे. त्यामुळे या परिसरात 11 नवीन शहरे वसवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी 'सकाळ'ला दिली.

Web Title: marathi news marathi websites Devendra Fadnavis Mumbai Thane Palghar