राज्यात 6031 स्वाइन फ्लूबाधित रुग्ण 

राज्यात 6031 स्वाइन फ्लूबाधित रुग्ण 

नागपूर : राज्यात ऑक्‍टोबरपर्यंत 6031 रुग्ण स्वाइन फ्लूने बाधित झाल्याचे आढळून आले असून, त्यापैकी 719 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह जवळपास 73 आमदारांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर सावंत यांनी लेखी उत्तर दिले. 

राज्यात स्वाइन फ्लूवरील ऑसलटॅमीवीर या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत काही उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्यामध्ये रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, त्यांच्यावर विनाविलंब उपचार, स्वतंत्र कक्ष, पाच शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान, खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना, ऑसलटॅमीवीरचा पुरेसा साठा, गर्भवतींना फ्लू प्रतिबंधक लसीकरण करणे, शासकीय व खासगी डॉक्‍टरांसाठी स्वाइन फ्लूबाबत कार्यशाळा आयोजित करणे आदी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com