वीजवाहिन्यांचे जाळे राज्यभरात विस्तारणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्यात अतिरिक्त वीज वाहून आणण्यासाठी क्षमतावाढ आणि वीज पारेषण यंत्रणेतही भर पडणार आहे. महापारेषण कंपनीने पाच वर्षांचे नियोजन जाहीर केले आहे. 2022 पर्यंत राज्यातील उपकेंद्र वाढीचे आणि वीज पारेषण वाहिन्यांच्या विस्ताराचे संकेत महापारेषणने दिले आहेत. 

पाच वर्षांत राज्यात 86 अति उच्चदाबाची उपकेंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट महापारेषणने ठेवले आहे. राज्यभरात 14 हजार 253 किलोमीटर पारेषण वाहिन्यांचे जाळे राज्यात उभारण्याचा महापारेषणचा मानस आहे. राज्यातील ग्राहकांना पूर्ण दाबाने वीज देण्याचे धोरण महापारेषणने आखले आहे.

2018 ते 2022 या काळातील कामाचा आराखडा महापारेषण कंपनीने मांडला आहे. महाराष्ट्रातील वीज क्षेत्राच्या इतिहासातील सर्वाधिक असा 23 हजार मेगावॉट वीज पारेषणचा विक्रम महापारेषणने 30 मार्चला यशस्वीरीत्या करून दाखवला. राज्यात 25 हजार मेगावॉट वीज पारेषणाची महापारेषणची क्षमता आहे. सध्या महापारेषणची 400 केव्ही क्षमतेची 32 उपकेंद्रे आहेत. 220 केव्ही क्षमतेची 219 उपकेंद्रे आहेत. 

या पाच वर्षांच्या आराखड्यात दुसरी वाहिनी टाकणे, पारेषण वाहिन्या बदलणे, नवीन व्होल्टेज विद्युत स्तर निर्माण करणे, सध्याच्या यंत्रणेच्या क्षमतेत वाढ करणे, नवीन पारेषण जोडवाहिनी तयार करणे आदींचा समावेश आहे. या आराखड्यामुळे 30 हजार 196 एमव्हीए क्षमता वाढेल. 14 हजार 253 किलोमीटर वीजवाहिन्या नवीन टाकल्या जातील. 30 हजार 196 एमव्हीएची रोहित्र क्षमता राहील. या कामांसाठी 1 हजार 365 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

अतिउच्चदाब उपकेंद्रात विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागांत 25 केंद्रे, उत्तर महाराष्ट्रात 19 केंद्रे, मराठवाडा-औरंगाबाद विभागात 14 उपकेंद्रे, उर्वरित महाराष्ट्रात वाशी, पुणे, कराड येथे 28 उपकेंद्रे उभारली जाणार असून, यापैकी काहींचे काम सुरू झाले आहे. यापैकी अमरावती विभागात पाच, औरंगाबादला पाच, नागपूरमध्ये सहा, नाशिक तीन, पुणे चार आणि वाशी येथे एका उपकेंद्राचे काम सुरू झाले आहे.