'कर्जमुक्ती झाली' हे सिध्द करुन दाखवा : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई : कर्जमुक्तीचं वातावरण राज्यात घोंगावतयं पण प्रत्यक्ष कर्जमाफी होत नाही. कर्जमुक्तीचे अर्ज भरण्यासाठीची निम्मी केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे ज्यांना कर्जमुक्ती मिळाली, त्यांची नावे पत्त्यासह द्यावी, असे आव्हान देताना 'जनतेच्या ताकदीशी अहंकाराने वागू नकाट असा इशारा आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कर्जमुक्तीवरुन उध्दव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला चढवला. 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आणि 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. त्यावर,कर्जमुक्तीचा लाभ मिळालेले शेतकरी राज्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी, असा चिमटा काढताना कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी विधानसभेत जाहीर करावी. प्रत्येक घरात जावून आम्ही ही यादी तपासून पाहू, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. कर्जमुक्तीचे अर्ज भरण्याचे 26 हजार पैकी 13 हजार केंद्र बंद आहे. मग,दहा लाख शेतकरी पात्र ठरल्याची आकडेवारी कोठून आली असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

मिरा भाईंदर महानगर पालिका निवडणुकीवर शिवसेनेत पुन्हा स्पर्धा लागली आहे.या निवडणुकीच्या सभेत शिवसेनेचे नाव न घेता त्यांना निधीसाठी आमच्याकडेच यावे लागेल असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला होता.त्याचा समाचार घेताना उध्दव ठाकरे म्हणाले,"विधानसभेत पाठिंबा मागायला त्यांना आमच्याकडे यावे लागले होते.जनतेच्या ताकदिशी अहंकारने वागू नका.शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर कर्जमाफी द्यावीच लागली होती.असा टोलाही त्यांनी मारला.तर,पक्षात आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी कोणाचीही गरज नसण्यासारखी विधाने करावी लागतात असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.

भाकितांवर बोलत नाही
कॉंग्रेसचे नेते नारायण राणे भाजप मध्ये जाणार आहे.त्याबाबत आपली काय भुमिका असे पत्रकारांनी विचारले असता मी भाकितांवर बोलत नाही.घटना घडल्यावर बोलतो.उद्या मराठवाड्यात पाऊस पडणार आहे असाही अंदाच आहे.अशा शब्दात त्यांनी राणे यांनाही चिमटा काढला.