मुकणेच्या थेट पाईपलाईनचे काम लांबणीवर,नाशिककरांना प्रतिक्षा

residenational photo
residenational photo

नाशिक : गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने तुडूंब भरलेल्या मुकणे धरणातून सद्यस्थितीत पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे थेट पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाईपलाईनचे काम लांबणीवर पडून मुकणे धरणाच्या पाण्यासाठी नाशिककरांना डिसेंबर अखेर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवू गंगापूर धरणातील पाणीसाठा नागरिकांना पुरणार नसल्याने ईगतपुरी तालुक्‍यातील मुकणे धरणाचे पाणी नाशिक शहरासाठी राखिव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुकणे धरणातून अठरा किलोमीटरची थेट पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले असून एल ऍण्ड टि कंपनीला 265 कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. पाईपलाईन योजना राबविताना मुकणे धरणात पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरु आहे.

विल्होळी येथील जलशुद्धीकरण बांधण्याचे काम पुर्णत्वास आले असून येथील पाणी शहरातील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, राजीवनगर तसेच थेट गांधीनगर पर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण तुडूंब भरल्याने पंपिंग स्टेशनच्या हेडवर्क्‍स उभारण्याचा कामात अडचणी निर्माण होत आहे. जोपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी खोलवर जात नाही तोपर्यंत कामे करता येत नसल्याची बाब जानेवारी महिन्यात तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाकडे आवर्तन सोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. 

पाण्याची मागणी नोंदविली जात नाही. शिवाय खालच्या धरणांमध्ये पुरेसे पाणी असल्याने आवर्तन सोडण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला होता. 28 फेब्रुवारीला एक आवर्तन सोडण्यात आल्याने धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. हेडवर्कच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असला तरी हेडवर्क्‍सचे काम फक्त 58 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पुर्ण होण्याची शक्‍यता नसल्याने किमान सहा महिने महापालिकेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com