पेव्हर ब्लॉकमुळे रस्ते दुरुस्ती योग्यप्रकारे होते का? 

पेव्हर ब्लॉकमुळे रस्ते दुरुस्ती योग्यप्रकारे होते का? 

मुंबई - राज्यभरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी केल्या जाणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या वापराबाबत शुक्रवारी (ता. 23) मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्‍न उपस्थित केला. अशाप्रकारे पेव्हर ब्लॉक वापरून रस्ते दुरुस्ती योग्यप्रकारे होते का, असा सवाल न्यायालयाने केला. 

मुंबईसह राज्यभरातील रस्ते दुरुस्तीच्या समस्येबाबत न्यायालयाने केलेल्या स्युमोटो याचिकेवर आज न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पेव्हर ब्लॉक लावताना त्यामध्ये चूक झाली, तर रस्ते दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत अभ्यासपूर्ण विचार करावा, असेही खंडपीठाने सुचवले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळण्याचा अधिकार आहे; मात्र खड्ड्यांमुळे या अधिकारामध्ये बाधा येत आहे, असेही न्यायालय म्हणाले. खड्ड्यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऍपबाबतही या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. या ऍपवर फोटो अपलोड होण्यास वेळ लागतो, त्याशिवाय तक्रारींची दखलही घेतली जात नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले; तसेच कंत्राटदाराचे नावही जाहीर करण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे. त्यामुळे संबंधित रस्ता दुरुस्तीबाबत जबाबदार व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करता येऊ शकेल, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com