रिपब्लिकन ऐक्यासाठी कोणताही त्याग करायला तयार: आठवले 

Ramdas Athwale
Ramdas Athwale

मुंबई : रिपब्लिकन ऐक्यात सर्व समाजाचे ऐक्य होत असेल तर त्यासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. रिपब्लिकन ऐक्यासाठी भारतीय दलित पँथर संघटन मी बरखास्त केले होते. ऐक्यासाठी माझी सदैव कोणताही त्याग करण्याची तयारी राहिली आहे.समाजाच्या हितासाठी सत्ता संपादन केली पाहिजे. त्यासाठी व्यापक रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे. ऐक्यासाठी मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास  तयार आहे. प्रकाश आंबेडकरांशीवाय रिपब्लिकन ऐक्य पूर्ण होऊ शकत नाही व्यापक रिपब्लिकन ऐक्यासाठी समाजसेवक आणि पत्रकारांनीही प्रयत्न करायला हवेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

भीमछाया सांस्कृतिक केंद्र कालिना, मुंबई या संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त काल ता. 17 रोजी दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे आयोजित सोहळ्यात ना आठवले बोलत होते. यावेळी मंचावर संपादक बबन कांबळे; भीमछाया सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष प्रकाश मोरे ;सामाजिक न्याय विभाग चे सहसचिव दिनेश डिंगळे; किशोर मोरे; रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; काकासाहेब खंबाळकर; विजय जाधव ; भीमछाया केंद्राचे उपाध्यक्ष दीपक सोनवणे; चंद्रशेखर कांबळे हेमंत रणपिसे रतन अस्वारे दीपक साळवी; किसन रोकडे अमित तांबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रामदास आठवलेंच्या हस्ते गायिका कृतिका बोरकर हीचा सत्कार  करण्यात आला.

व्यापक टिकणारे रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे. केवळ एकदिवसापूरते टिकणारे एक मंच एक सभा असे ऐक्य नको. समता सैनिक दलात ही अनेक गट आहेत .स्वतः गटबाजीला बळ देणारे लोक ऐक्य करण्याचे आवाहन करतात. रिपब्लिकन ऐक्याला मी सुरुवातीपासून  तयार आहे जे तयार नाहीत त्यांच्या सभेत जाऊन प्रश्न विचारण्यापेक्षा  ऐक्याला जे तयार आहेत त्यांना प्रश्न विचारणे योग्य नाही . तथागत बुद्धांच्या काळात बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी निर्णय घेण्याची बहुमताची प्रक्रिया होती तशीच रिपब्लिकन ऐक्यात बहुमतानुसार निर्णय घेण्याची पद्धत अवलंबावी. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास ते टिकण्यासाठी रिपब्लिकन कोअर कमिटी करावी व त्यात जे राजकीय निर्णय बहुमताने मंजूर होतील ते सर्वांना बंधनकारक होतील. अशी सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केली.

भीमछाया सांस्कृतिक केंद्राची जमीन  संस्थेच्या नावे करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ना रामदास आठवलेंनी आश्वासन दिले. भीमछाया सांस्कृतिक केंद्राच्या मुख्य प्रवर्तकआधारस्तंभ म्हणून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला. 

शहरात आंबेडकरी जनता सक्षम आहे मात्र ग्रामीण भागात आजही अल्पसंख आणि गरीब आहे आर्थिक हालाकीचे दिवस काढत आहेत .त्यांना संरक्षण देण्याचा त्यांना आर्थिक आत्मनिर्भर करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे त्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास एक व्हा आणि  सत्ता हस्तगत करण्याचा संदेश दिला आहे. त्यासाठी सत्तेत सहभागी व्हा. दररोज मी देशभर फिरतो .हजारो लोकांना भेटतो . शेकडों लोकांना मदत होत राहते मात्र मी केंद्रियमंत्री झाल्याने काहींच्या पोटात दुखते. ते लोक खोटा प्रचार करून सोशल मीडियात तरुणांची माथी भडकवितात. पण जो बौद्ध आहे त्याने शांत राहून विचार केला पाहिजे.भडकून अविचाराने वागायला नको.

काळाराम मंदिर सत्याग्रहात दगडफेक झाली तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंसेला हिंसेने उत्तर देऊ नका असे आपल्या समाजास आवाहन करून शांत राहण्याचा सल्ला दिला होता. आताही दलित मराठा यांच्यात वैरभाव निर्माण करून दोन्ही समाजाचे भले होणार नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाने सामाजिक सलोखा स्थापन्यासाठी सलोखा रॅली आयोजित केल्या आहेत.असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com