विधानभवनावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा उद्या हल्लाबोल मोर्चा

Congress, NCP
Congress, NCP

नागपूर : शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि यवतमाळमधील विषारी कीटकनाशकांच्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी उद्या (ता.12) विधानभवनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) या पक्षांचा एकत्रित मोर्चा धडकणार आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि माजी केंद्रीयमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. 

उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षा भूमीजवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरुवात करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेज जवळ एकत्र येऊन विधान भवनाच्या दिशेने मार्गस्थ होतील. दोन्ही पक्षांचे मोर्चे लोकमत चौकात येतील आणि तेथून एकत्रितपणे विधानभवनावर धडकणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या तीन वर्षात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरुण कोणीही समाधानी नाही. सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे जनतेत प्रचंड संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम या जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागातून येणारे नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा वर्धा रोडवरील प्राईड हॉटेल चौकात पोलिसांनी अडवली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. या आंदोलनामुळे वर्धा रोड वाहतुकीस बंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com