2022 पर्यंत नवी मुंबईचे चित्र पालटणार : पंतप्रधान

National News Mumbai News PM Narendra Modi Magnetic Maharashtra
National News Mumbai News PM Narendra Modi Magnetic Maharashtra

नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात आले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, ''येत्या 2022 पर्यंत नवी मुंबईचे चित्र पालटण्यात येणार आहे. नवी मुंबईतील रस्ते आणि हवाई वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिल''. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ''1997 मध्ये तत्कालीन अटलबिहारी सरकारने विमानतळांचे स्वप्न पाहिले होते. मात्र, त्यानंतरच्या सरकारने काहीही केले नाही. हा प्रकल्प फक्त कागदावर होता. पण आमच्या सरकाने यातील सर्व अडथळे दूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. याशिवाय देशात एव्हिएशन पॉलिसी नव्हती, आमच्या सरकारने याबाबतची पॉलिसी आणली''. एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

तसेच सध्या देशात 450 खासगी सरकारी विमाने आहे. त्यानंतर सरकारने 900 नवीन विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई येथे होणार आहे. 

दरम्यान, पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''यापूर्वीच्या सरकारने या प्रकल्पासाठी काहीही केले नाही. लटकाना, अटकाना, पटकाना असे यापूर्वीच्या सरकारचे धोरण होते''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com