बस इतना ही दे दे जितना…नीरव मोदी लेकर भागा है। 

marathi news nirav modi vijay mallya lalit modi bank corruption
marathi news nirav modi vijay mallya lalit modi bank corruption

पाली (जि. रायगड) - नीरव मोदी पीएनबी बँकेला साडेअकरा हजार कोटींचा चुना लावून गेला. त्याच्याप्रमाणेच ललित मोदी व विजय मल्ल्या आदी बड्या धेंड्यांनी देखील हजारो-करोड रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले. या बड्या धेंड्यांवर सर्वसामान्य नागरीक प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून यांच्यावर जोक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्या रागाचा निचरा करत आहे. अतिशय कल्पकतेने आणि सुक्ष्म निरक्षणातून बनविलेल्या या पोस्ट खरंच सगळ्यांना पटत आहे. यातून सर्व सामान्य जनतेच्या व्यथा आणि आगतिकता प्रकर्षाने समोर येत आहे आणि या बरोबरच अनेकांचा विरंगुळा देखील होत आहे. 

काही पोस्टमध्ये आघाडी सरकारवर, तर काही पोस्टमध्ये मोदी सरकारवर मार्मिक टिका केली गेलेली आहे. तसेच छगन भुजबळ आणि डि. एस. कुलकर्णीवर देखील सहानूभुतीच्या पोस्ट फिरत आहे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि गर्भ श्रीमंतांना दुसरा न्याय का? असा सवाल देखील सोशल मिडियावर विचारला जात आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही सहानुभूती दाखविली जात आहे. बँकांवर देखील मोठ्या प्रमाणत टिका होत आहे. सध्या फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटरवर मोदी आणि मल्ल्यांचीच रंगतदार चर्चा सुरु आहे.

विनोदी परंतू मार्मिक पोस्ट 
 - एकांतात नरेंद्र मोदींच्या डोळ्यांत अश्रू पाहून महात्मा गांधी म्हणाले, 'का रडतोस..?' त्यावर मोदी म्हणाले, 'देश उन्नत्तीसाठी दिवस-रात्र प्रयत्न करतोय. पण माझ्याच आडनावांची माणसं घोटाळे करुन मला बदनाम करताहेत.' महात्मा गांधी म्हणाले, 'माझ्याकडे बघ...मी रडतोय का..' 

- ज्यादा ख्वाहिशे नही ऐ खुदा तुझसे... 
बस इतना ही दे दे जितना… निरव मोदी लेकर भागा है…

- कर्ज पण किती अजब आहे. श्रीमंतांजवळ वाढले तर देश सोडून जातात आणि शेतकऱ्यांकडे वाढले तर देह सोडून जातात. 

- आता कर्ज देताना सर्वजण अतिशय सावध झाले आहेत! 
कालच मी बायकोकडे २५०० रुपये मागितले तर म्हणाली, 'आधी पासपोर्ट माझ्या ताब्यात द्या'... 

- माझी तर एकच ईच्छा आहे, 
'गिव्ह मी अ लोन अॅन्ड लीव्ह मी अलोन' 
आमचे मार्गदर्शक नीरव मोदी, प्रेरणास्थान मल्ल्या सर.  

- क्या मजाक है...!!
घोटाला करनेवाला गुजराती, जांच करनेवाला गुजराती, आरबीआय गव्हर्नर गुजराती, फायनान्स सेक्रेटरी गुजराती, टॉप पे गुजराती, प्लॅनिंग कमिशन मे गुजराती और बँक लुटी बेचारे सरदारों की। 

- विजय मल्ल्या गेला फॉरेनला पळून… नीरव मोदी पण गेला फॉरेनला पळून… ललित मोदी कधीचाच पळून गेला त्या छगन भुजळांना काय झाले होते पळून जायला? इथेच तर मराठी माणूस कमी पडतो.

- ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या पळून जातात. पण आमचे डिएसके मात्र पळून जात नाहीत. कायदेशीर लढाई लढून पैसे परत करण्याचे आश्वासन माध्यमांसमोर देतात. हाच फरक इतरांत आणि एका सच्चा मराठी उद्दोजकात आहे... 

- 11500 करोड लुटले तरी चालतील, पण २ रुपयांचा पेन चोरीला जाता कामा नये. तो दोरीने बांधून ठेवतील हे बँकवाले...

- करोडोंचा घोटाळा होईपर्यंत बँकांना कळत नाही, परंतु महिन्याला मिनीमम बॅलन्स कमी झालेला बँकांना बरोबर कळतो, ते कसे काय?

- मोदी: मित्रो ये जितने भी चोर देश से भागे है न, सबको पकडके लाना है के नही???
भक्त: लाना है
मोदी: आपका पैसा वापस मिलना चाहिये की नही मिलना चाहिये? 
भक्त: मिलना चाहिये
मोदी: तो मित्रो मुझे बस ५ साल और दिजिये। ये लोग जहाँ कही भी हो, सारी दुनिया घुम के, उन्हे लेकर आऊंगा। 
भक्त: मोदी मोदी मोदी 

- मोदीजी को ये तो पता चल जाता है कि पाकिस्तान अहमद पटेल को सीएम बनाना चाहता है।
मनमोहन सिंह पाकिस्तान के साथ मिले हुए है.. पूर्व सेना प्रमुख गुप्त मीटिंग करते है पाकिस्तान के अफसरों के साथ… लेकिन नीरव मोदी देश लूट के भाग रहा है। ये मोदी जी को नही पता चलता।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com