मंत्रालयात वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई - आपल्या प्रश्‍नांची तड लागली नाही तर मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे सत्र काही केल्या थांबेना झाले आहे. काल दुपारी चारच्या सुमारास एका ६५ वर्षीय वृद्धेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे भरती करून उपचार सुरू आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्‍यातील वडगाव गावातील सखूबाई विठ्ठल झाल्टे (६५) या महिलेने मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेला पोलिसांनी तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, या वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला होता. अनिल वाल्मीकी झाल्टे व सुनील वाल्मीकी झाल्टे यांनी या वृद्धेची जमीन हडप केल्याची तिने तक्रार केली होती. याबाबतचा वाद न्यायालयात सुरू होता. न्यायालयातदेखील न्याय मिळाला नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी ही वृद्धा आली होती. 

या ज्येष्ठ महिलेसोबत रामकृष्ण नावाचा तिचा २४  वर्षांचा मुलगा होता. तो पुण्यात कृषिसेवक म्हणून नोकरीस आहे. मंत्रालयातून बाहेर पडताच तिने आपल्याजवळ असलेल्या एका बाटलीत असलेले विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मंत्रालयाच्या दारावर असलेल्या पोलिसांनी आणि बाहेरील काही नागरिकांनी त्या महिलेला तातडीने टॅक्‍सीतून सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: marathi news old woman suicide in Mantralaya nashik