न झालेला मुख्यमंत्री गेला ; महाराष्ट्र पोरका झाला 

न झालेला मुख्यमंत्री गेला ; महाराष्ट्र पोरका झाला 

राज्यावर एक आघात झालायं. सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्रातील घराघरात आज शोककळा पसरली आहे. दुष्काळी पट्ट्यातील एक मुलाने पुण्यात येवून तथाकथीत हुशार लोकांच्या पेठेत स्वताचे विद्यापीठ स्थापन केले हेच अाश्चर्य कारक आहे. वयाच्या 21 व्या वर्षी विद्यापीठ स्थापन करून त्याचा विस्तार इतका वाढवला की महाराष्ट्राच्या गावागावात भारती विद्यापिठाचे शाळा महाविद्यालयात बहूजनांची हजारो पोरं धडे गिरवत आहेत. या विद्यापीठाच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये एकूण 180 शैक्षणिक संस्था आहेत. यात भारतातीलच नाही तर परदेशातील मुलं शिक्षण घेतात. ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक संस्था म्हणून गणल्या जाते. 

पतंगराव कदम यांचा जन्म 1945 साली सांगली जिल्ह्यातील सोनसाळ या गावात जन्म झाला. ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पतंगरावांनी पुढे पीएचडी केली. स्वाताचं विद्यापाठ स्थापन केलं. त्याचा विस्तार इतका मोठा केला की इवलासा वेलू गगनावरी गेला असं म्हणावं लागले. 

महाराष्ट्र राज्याचे वने, मदत व भूंकप पुनर्वसन मंत्री म्हणून काम पाहिलेल्या पंतगरावांचे वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठीही रेसमध्ये पण ऐनवेळी इतरांनी बंडाचा झेंडा पुकरण्याचे लक्षात येताच पंतगरावांना थंड केलं जायचं.

पतंगराव कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होती. खासदार शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पंतगराव कदमांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्येच थांबणे पंसत केले. त्याची किंमत त्यांना वेळीवेळी चुकवावी लागली. खासदार शरद पवार यांच्याशी त्यांचा चांगला स्नेह होता. खासदार शरद पवारांविषयी बोलताना ते नेहमी खुलून बोलायचे. पंतगराव म्हणायचे, " खासदार शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात दोन चुका केल्या एक म्हणजे डिफेन्स मंत्री झाल्यावर महाराष्ट्रात परत येवून मुख्यमंत्री व्हायला नको होतं अन् दुसरी म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडायला नको होती, अन्यथा आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला असता अशी खंत माजी पंतगराव कदम यांनी विधानसभेत व्यक्त केली होती. 

सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायपालट करण्याचे काम पंतगराव कदम यांनी केले. राज्यातील सहकारला वेगळ्या उंचीवर घेवून जाण्याचे काम पतंगरावांनी केले. कडेगाव येथिल सोनहिरा सहकारी साखर कारखाना असो की, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी असो की पलूस येथिल कृष्णा-वेरळा सहकारी  ग्राहक भांडार असो,  मल्टीशेड्यूल्ड बँक असो. पंतगराव कदम यांचे व्यवस्थापन कौशल्य दिसून यायचे. पंतगराव कदम यांनी अनेक सहकारी संस्थांचे संस्थापना केली. त्या मोठ्या जोमाने चालवून दाखवल्या. त्या सहकारी संस्थामध्ये लोकांच्या हितासाठी काम कसं करायचं याचा एक आदर्श वस्तूपाठ पतंगराव कदम यांनी घालून दिला. सहकारातील ते एक जिवंत विद्यापीठच होते.

नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी आपल्या संस्थांच्या शाखा सुरू केल्या होत्या. पुण्यात असलेल्या महाविद्यालय व सहकारी संस्थामध्यो सांगली सातारा परिासरातील तरूण होतकरू मुलांना हेरून त्यांचे शिक्षण पुर्ण करण्याची जबाबदारी पंतगराव घ्यायचे. असे हजारो विद्यार्थी पंतगराव कदम यांनी आपल्या संस्थेत घडवले. त्यांच्या शिक्षणाचा पुर्ण खर्च करीत पुढे त्यांना आपल्या संस्थेत नोकरी ते देत असत.

त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले गेले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूषण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार”  अशा मानाच्या पुरस्कारांने त्यांना गौरवण्यात आले होते.

गावखेड्यातील माणसाचं दु:ख समजून त्यांना आधार देणारा आधारवड हरवला आहे. महाराष्ट्राचा न झालेला मुख्यमंत्री आज आपल्यातून गेला आहे. महाराष्ट्रातील जनता आज पोरकी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com