फडणवीसांनी घोषणा केलेले प्रकल्प कुठे आहेत : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Live Interview
Prithviraj Chavan Live Interview

पृथ्वीराज चव्हाण 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवार) 'सकाळ'च्या फेसबुक पेजवरील चर्चेत सहभाग घेतला. 

महाराष्ट्रातील राजकारण, गुजरातची विधानसभा निवडणूक, उद्योगांची परिस्थिती आदी विषयांवर चव्हाण यांनी मोकळेपणाने गप्पा मारल्या. 

पृथ्वीराज चव्हाणांशी गप्पांमध्ये सहभागी व्हा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले प्रकल्प कुठे आहेत, अशी विचारणा माजी मुख्यमंत्र्यांनी केली. "फॉक्सकॉन नावाची कंपनी महाराष्ट्रामध्ये 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. मात्र, ही गुंतवणूक का झाली नाही याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारण्यात आली तेव्हा डोकलाम येथे भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे ही गुंतवणूक करण्यात आली नाही, असे कारण देण्यात आले," असे चव्हाण यांनी सांगितले. 

"सध्या देशाच्या विकासदराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी गाजावाजा करून मेक इन महाराष्ट्रची घोषणा करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली. राज्य सरकारने जाहिरातींवर नेमका किती खर्च करण्यात आला हेही त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही," अशी टीका त्यांनी केली. 

गेल्या तीन वर्षांतली केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी यावर चव्हाण म्हणाले, की काँग्रेस पक्षाने साठ वर्षात काही केले नाही, हे ऑर्ग्युमेंटच चुकीचे आहे. मोदी सरकारच्या 23 घोषणा म्हणजे काँग्रेस सरकारच्या योजनांची नावे बदलून सादर केलेल्या योजना आहेत. मोदी सरकारने ज्या नवीन घोषणा केल्या, त्याचे मुल्यमापन केले पाहिजे. समृद्धी महामार्गाच्या नावावर राज्य सरकारने तीन वर्षे घालवली आहेत. 

विरोधी पक्ष म्हणून आमची कामगिरी समाधानी नाही, असेही चव्हाण यांनी प्रांजळपणे मान्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com