एकाच धर्माचे विचार  लादणे अयोग्य - पवार 

एकाच धर्माचे विचार  लादणे अयोग्य - पवार 

पुणे - ‘‘धर्मनिरपेक्षतेशी लोकशाही राज्यव्यवस्था सुसंगत असावी. पण एकाच धर्माची विचारप्रणाली देशावर लादणे अयोग्य आहे,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. दलितांच्या बाबतीत समान धोरण असावे, याबाबत त्यांनी सूतोवाचही केले.  

पुणे धर्मप्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डाबरे यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. ख्रिश्‍चन समाजाच्या समस्या पवार यांनी जाणून घेतल्या. गेली साठ वर्षे तीन कोटी ख्रिश्‍चन दलितांनादेखील इतर दलितांप्रमाणे आरक्षण व सवलती मिळाव्यात, यासाठी राष्ट्रव्यापी लढा सुरू आहे. परंतु ख्रिश्‍चन दलितांना अजूनही त्या सवलती मिळाल्या नाहीत. हे भारताच्या संविधानाशी जुळणारे नाही, यास पवारांनी दुजोरा दिला. तर ख्रिश्‍चन समाजातील गुणवंत, सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांना संधी देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, असे बिशप थॉमस डाबरे यांनी सांगितले. 

सामाजिक कार्यकर्ते मायकल साठे, जॉन गजभिव, रे फर्नांडिस, डॉ. जोशूआ रत्नम, वसंत गजभिव, सुधीर पाटील, रॉक गोम्स  उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com