नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार  - रामदास आठवले

नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार  - रामदास आठवले

सोलापूर - राज्यात शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र आगामी लोकसभा व विधानसभा शिवसेना-भाजप-रिपाइंने एकत्र लढविण्यासाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांशी आपण चर्चा करणार आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत "एनडीए'तील सर्वच घटकपक्ष एकत्र निवडणूक लढवतील, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आठवले पत्रकारकारांशी संवाद साधताना म्हणाले, ""शिवसेना स्वतंत्र लढल्यास भाजपसोबत युती करून रिपाइं लोकसभेच्या पाच ते सहा जागा मागणार आहे. सोलापूरची जागा भाजपकडे आहे. भाजपने सोलापूरची जागा आम्हाला सोडल्यास राजाभाऊ सरवदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागासवर्गीय महामंडळांनाही कर्जमाफी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.'' 

राज्यातील मराठा व दलित समाजांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगून आठवले म्हणाले, ""त्यादृष्टीने मी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. दलित व मराठा समाजांच्या ऐक्‍यामध्ये खडा टाकणाऱ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. सध्या अस्तित्वात असलेले आरक्षण, तसेच ठेवून यापुढे आरक्षण देताना आर्थिक निकषांचा विचार करण्यास आमच्या पक्षाची हरकत नाही.'' आरक्षणासंदर्भात शरद पवारांबाबत माझा गैरसमज झाल्याचेही त्यांनी मान्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com