रतन टाटा यांना "महाउद्योगरत्न' 

रतन टाटा यांना "महाउद्योगरत्न' 

मुंबई - टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल "महाउद्योगरत्न' या राज्याच्या सर्वोच्च उद्योग पुरस्काराने गौरवण्यात आले; तर रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांना या वेळी "महाउद्योगश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. 

राज्याच्या विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी सरकारला मिळाली, असे हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. 

महाराष्ट्राबद्दल आपल्याला नितांत आदर असल्याची भावना रतन टाटा यांनी या वेळी व्यक्त केली. निवृत्तीनंतर समाजाला आपला विसर पडतो, मात्र महाराष्ट्र सरकारने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल आभारी आहे. या वेळी वस्त्रोद्योगातून राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेमंड समूह 1925 मध्ये ठाण्यात सुरू झाला. आज राज्यभर त्याचा विस्तार आहे. त्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सिंघानिया यांनी आभार मानले. 

या वेळी माहिती तंत्रज्ञान, निर्यात, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, महिला उद्योजक, खादी ग्रामोद्योगातील उद्योजकांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूर येथील जयसिंग चव्हाण या दिव्यांग उद्योजकांचा विशेष गौरव करण्यात आला. सोहळ्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सुमित मलिक, सुनील पोरवाल, हर्षदीप कांबळे, संजय सेठी आदी उपस्थित होते. या वेळी सुदेश भोसले यांच्या मैफिलीने उपस्थितांना ठेका धरायला लावला. 

उद्धव ठाकरे अनुपस्थित 
या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख होता. मात्र ते आज या समारंभाला उपस्थित नव्हते. उद्योगमंत्री सुभाष देसाई वगळता शिवसेनेचा कोणीही मोठा नेता या समारंभास कालपासून हजर नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com