साम टीव्हीवर आज साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई  - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून "साम' वाहिनीने यंदाही साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. कविता, कथा आणि परिसंवादातून मराठी भाषेचे वैभव अधोरेखित करणाऱ्या या "इन्फ्राटेक प्रस्तुत' साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण उद्या (ता.27) दुपारी 12 वाजल्यापासून "साम' वाहिनीवरून केले जाणार आहे. 

मराठी राजभाषा दिनानिमित्त तीन वर्षांपासून "साम' वाहिनी साहित्य संमेलन आयोजित करत आहे. यंदा संमेलनाचे चौथे पर्व आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कथाकार अप्पा खोत, ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख, कवी नारायण पुरी, कवयित्री रमणी बबिता आकाश, "किशोर' मासिकाचे संपादक किरण केंद्रे, मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉ. वीणा सानेकर, वाचनालय चळवळीतील कार्यकर्ते राजीव जोशी आदी मान्यवर या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. "साम' वाहिनीचे वरिष्ठ निर्माता आणि कवी दुर्गेश सोनार यांनी या साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केले आहे.

Web Title: marathi news saam tv sahitya sammelan marathi