डिजिटल तंत्राला प्रतिसाद! 

सुहास कोकाटे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

या गोष्टी विसरू नका

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी "स्मार्ट' तंत्राचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होत जाणार आहे. "स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. 

मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजी "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत पुण्यामधील गणेश कला क्रीडा सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला. हा किस्सा होता, योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांची स्थिती कशी होऊ शकते याचा! ते सांगत होते, ""काही काळापूर्वी पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होता. मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर ठाकरे बाहेर पडताना एक विद्यार्थी त्यांच्या जवळ आला, अगदी पायांवर डोके ठेवले व सर हा माझा चौदावा प्रयत्न आहे, या प्रयत्नानंतर माझी वयाची मर्यादाही संपत आहे, या वेळी मी उत्तीर्ण झालो नाही, तर माझ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. विचारपूस करता, योग्य मार्गदर्शनाअभावी आजवरची वर्षे खर्ची गेली असे उत्तर मिळाले.'' 

ठाकरे सर सांगत होते आणि आमच्यासमोर महाराष्ट्रातील चित्र तरळले. याच चित्राचा मागील काही वर्षे अभ्यास करून शिवनेरी फाउंडेशनने विद्यार्थ्यांना योग्य व नेमके मार्गदर्शन अल्प किमतीत उपलब्ध करता येईल अशा अभ्यासक्रमाची रचना केली आणि अल्पावधीत त्याला प्रतिसादही मिळू लागला. आज महाराष्ट्रात जे स्पर्धा परीक्षेचे उमेदवार हे तंत्र वापरत आहेत, त्यांना पूर्ण विश्‍वास आला आहे, की हेच तंत्र आपल्याला यशाजवळ घेऊन जाऊ शकते. पेनड्राइव्ह व मेमरी कार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे यशच जणू त्यांच्या मुठीत उपलब्ध करून दिले. या M.P.S.C. smart किटच्या साह्याने अभ्यास करणाऱ्यांना विश्‍वास मिळतोय, की जे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ते पाहत आहात व जी स्वप्ने त्यांच्याबद्दल कुटुंबीयांनी पाहिलेली आहेत, ती वेळेत होण्यासाठी हे तंत्र निश्‍चितच काम करते आहे याचा विश्‍वास त्यांनाही आलेला आहे. हे तंत्र अद्याप न स्वीकारलेल्यांनाही मी हेच सांगतो, की तुमचे यश तुम्हाला खुणावतेय, या क्षणाचे वेळीच साक्षीदार व्हा ! 

शिवनेरीच्या डिजिटल तंत्रात राज्यसेवा पूर्वपरीक्षा "पेपर 1' व "पेपर 2'मधील सर्व विषय, PSI/STI/ASO पूर्वपरीक्षा, तलाठी, Tax Asst, खात्यांतर्गत फौजदार परीक्षा, अशा वेगवेगळ्या परीक्षांची अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ लेक्‍चर्सची रचना केलेली आहे. त्याची गुणवत्ता समजून घ्यायची असल्यास "यू-ट्यूब'वर Shivneri Academy चॅनेल सर्च करावा. आपल्या अभ्यासामध्ये नेमकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय पुढील दीड वर्षे चालू घडामोडींचा पुरवठा, प्रश्‍नपत्रिकांचा पुरवठा होणार आहे, यातून निश्‍चितपणे अभ्यासामध्ये नेमकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. 

मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपण संकल्प, समर्पणाची भावना, शिस्त पाळण्याची तयारी व वेळेचे बंधन याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. एकदा ध्येय निश्‍चित केल्यावर त्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजे संकल्प! यशाचा योग्य दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला लागणारे इंधन म्हणून संकल्पाला ओळखले जाते, यालाच आपण इंग्रजीमध्ये Determination असे म्हणतो. ठरलेले ध्येय गाठण्यासाठी जिद्द असल्यास यशाची शक्‍यता वाढते. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, आपण जे ध्येय ठरवितो याविषयी तुमच्या हृदयामध्ये उत्कट निष्ठा असली पाहिजे. क्षणिक निष्ठा ध्येय प्राप्तीत अडथळे निर्माण करते. संकल्प करून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयोगशीलता सर्वांत महत्त्वाची ठरते. प्रयोगशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची धडाडी, क्रिएटिव्हिटी! मिळालेल्या संधीचे सोने करण्याची व नव्या संधी शोधण्याची वृत्ती, तसेच आपल्यामधील उणिवा शोधून स्वतःच्या क्षमता सतत वाढवीत राहणे आवश्‍यक आहे व यामध्ये स्वतःशी स्पर्धा स्वतःशीच करत स्वतःच सर्वोत्तम गाठण्याचा प्रयत्न आपल्याला संकल्पामधूनच करता येणार आहे. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, पण कष्ट करताना जोडीला विचार-आचार व कल्पकता असावी. एखादी संकल्पना मला समजत नसेल तर ती का समजत नाही, याचा विचार केला पाहिजे. फक्त हार्डवर्क नको, वर्क स्मार्ट असले पाहिजे. त्यामुळे अगदी पहिल्या प्रयत्नात व किमान दुसऱ्या तरी प्रयत्नात यशस्वी होणारे अनेक विद्यार्थी आपणास दिसतात. त्यांची अभ्यासपद्धती नेमकी "स्मार्ट' म्हणजे कशी असते व हे विद्यार्थी केलेला संकल्प कसे पूर्ण करतात, हे आपण समजून घेऊ. 

अभ्यासाची "स्मार्ट' पद्धत ही नेमका अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावर नेमके कोणत्या पद्धतीने प्रश्‍न विचारले जात आहेत, हे समजून घेणे ही आहे. यातून अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. दुसरा मुद्दा हा योग्य साधनसामग्रीची निवड करावी. ही निवड केल्यानंतर प्रत्येक घटकाचे छोटे-छोटे टप्पे पाडून ते पूर्णत्वास न्यावेत. एखादा घटक पूर्ण झाला आहे, असे आपणास वाटत असल्यास अशा घटकावरचे जास्तीत जास्त प्रश्‍न सोडवावेत. ते येणाऱ्या नेमक्‍या अडचणी आपल्या लक्षात येतात आणि अभ्यास पूर्णत्वास जातो. 

स्मार्ट अभ्यासासाठी "स्मार्ट किट...!' 
होय, मी "शिवनेरी'चे स्मार्ट किट घेतलेय आणि या परिपूर्ण किटमुळे मी आहे समाधानी! राज्यसेवेमध्ये यशस्वी होण्याचे माझे स्वप्न आहे. पण आजवर योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते, कोचिंग क्‍लास लावण्याचाही निश्‍चय केला, पण आर्थिक कारणांमुळे मला प्रवेश घेता आला नाही. कॉलेज संपल्यानंतर खासगी आय. टी. सेक्‍टरमध्ये काम करण्यास सुरवात केली. याच वेळी माझ्याबरोबर काम करत असलेले दोन ते तीन मित्र व मी बॅंकिंग क्षेत्रामधल्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाची घरीच सुरवात केली. हा अभ्यास सुरू असतानाच माझ्या एका मित्राची रेल्वेमध्ये, तर माझी संरक्षण क्षेत्रामध्ये निवड झाली. दरम्यानच्या काळात माझी इतर दोन ठिकाणीही निवड झालेली होती, पण आवड असल्यामुळे मी संरक्षण क्षेत्राचीच निवड केली. आता माझी सेल्स टॅक्‍स ऑफिसर होण्याची इच्छा आहे. पण मला वेळ काढून मार्गदर्शन वर्गामध्ये जाणे शक्‍य नाही. याचवेळी मी शिवनेरी ऍकॅडमीने तयार केलेल्या "एमपीएससी स्मार्ट किट'बद्दल ऐकले. थोडाही वेळ न घालवता मी त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर जाऊन व्हिडिओ लेक्‍चर्स पाहिले व त्याच दिवशी ते खरेदीही केले. मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो, की शिवनेरी ऍकॅडमीने ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे, ते पाहून व अभ्यासून मी पाहिलेले स्वप्न व माझा विश्‍वास बळकट झालेला आहे. या अभ्यासक्रमाच्या मदतीने मी पाहिलेले स्वप्न कोणताही मार्गदर्शन वर्ग न लावता पूर्ण करू शकतो. या "एमपीएससी स्मार्ट किट'मध्ये सर्व विषयांचे पूर्ण पॅकेज आहे व यामध्ये सर्व विषय शिकविण्यात आलेले आहेत, तसेच प्रत्येक घटक पूर्ण करण्यात आलेला आहे. मला यामध्ये असेही काही मुद्दे मिळाले की जे मला यापूर्वी वाचण्यात आलेले नव्हते. "शिवनेरी' चे "एमपीएससी स्मार्ट किट' माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरलेले आहे. मी यामधील व्हिडिओ लेक्‍चर्स व नोट्‌स केव्हाही पाहू शकतो व अभ्यास करू शकतो. मी शिवनेरी ऍकॅडमी व "सकाळ विद्या' यांचा "एमपीएससी स्मार्ट किट' तयार केल्याबद्दल आभारी आहे. आर्थिक कारणांमुळे व अन्य काही कारणांमुळे मार्गदर्शन वर्गामध्ये जाता येत नसलेल्या विद्यार्थ्यांना हे किट वरदान ठरेल अशी मला खात्री आहे. 
- युगुल पी नामपल्लीवार, डिफेन्स इस्टेट, नागपूर. 

माझा प्रवास योग्य मार्गाने... 
मी अनुभवातून सांगू शकतो, की "एमपीएससी' अथवा "यूपीएससी'सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ-पैसा-अनावश्‍यक श्रम यांची बचत करून यश संपादन करण्यासाठी एकमेव सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजेच सुहास कोकाटे यांची व्हिडिओ लेक्‍चर्स आहेत. याबद्दल आत्मविश्वासाने बोलण्याचे एकमेव कारण म्हणजेच मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. मी मे 2017 मध्ये सरांकडून सर्व व्हिडिओ लेक्‍चर्सचा डेटा घेतला व त्यानंतर दिलेल्या "पीएसआय', "एसटीआय', "टॅक्‍स-असिस्टंट', "एमपीएससी क्‍लार्क' आदींच्या प्रिलिअम पास होऊन मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. मुख्य परीक्षेचा स्कोअर प्रत्येक ठिकाणी निवड होईल असाच आहे. 

"शिवनेरी'ने दिलेल्या व्हिडिओ लेक्‍चर्सची खास वैशिष्ट्ये म्हणजे सर्व परीक्षाभिमुख घटकांचा समावेश. प्रत्येक घटकाचे परिपूर्ण व सखोल स्पष्टीकरण. घटकांच्या स्पष्टीकरणाची सोपी पद्धत, स्पष्टीकरणादरम्यान परीक्षेत येणाऱ्या घटकांवर जोर देऊन त्यांची पुनरावृत्ती करणे, सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजेच कोणताही रूम किंवा मेससारखा अनावश्‍यक खर्च न करताही घरीच पूर्ण तयारी करता येते. आजच्या काळात विद्यार्थ्यांना 80 ते 90 हजार रुपये खर्चूनही पदरी निराशाच पडणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला हा अपवाद आहे. "शिवनेरी'ने अतिशय अल्प किमतीत योग्य मार्गदर्शन केले आहे. 
- विठ्ठल राजपूत, बुलडाणा.

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: Marathi News Shivneri Foundation Suhas Kokate Writes Digital Technology