श्रीवर्धनला होणार श्रीमंत बाळाजी पेशवे स्मारक

Marathi news Shrivardhan Shrimant Balaji Peshwe Memorial
Marathi news Shrivardhan Shrimant Balaji Peshwe Memorial

दिवेआगर/लोणेरे : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत स्थानिक अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत श्रीवर्धन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, जितेंद्र सातनाक, अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्मारकासाठी राज्याच्या नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य या तीन विभागांकडून निधी देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून संग्रहालय, ऑडिटोरियम या वास्तूंसह भव्य पुतळाही लवकरच उभारला जाणार आहे. या स्मारकाच्या प्राथमिक आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धनच्या चित्पावन घराण्यातील पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असलेल्या श्रीवर्धन येथे पेशवे घराण्याची पिढीजात देशमुखी होती, अशी इतिहासात नोंद आहे. पेशव्यांचे मूळ गाव म्हणून आजही अनेक पर्यटक श्रीवर्धनला भेट देतात. सध्या श्रीवर्धन शहरात असलेल्या पेशवे मंदिराचा परिसर हा खेळांसाठी वापरला जातो. आतील परिसरात फिरल्यास कोणत्याही प्रकारे इतिहासाची कल्पना येत नाही. श्रीवर्धनला येणारे पर्यटक पेशव्यांचे ठिकाण पाहण्याच्या हेतूने येथे आवर्जून येतात; पण येथे श्रीमंत पेशव्यांच्या स्मारकाशिवाय ऐतिहासिक असे पाहण्यासारखे काही नसल्याने त्यांच्या हिरमोड होतो. श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी फिरण्यावरच पर्यटक समाधान मानून घेतात. पेशव्यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात त्यांचे कर्तृत्व दर्शवणारी विशेष ओळख असावी, असे मत अनेक पर्यटकांनी "सकाळ'कडे व्यक्त केले. 

सुधारित नियोजन 
पेशवे मंदिर परिसरातील सहा गुंठे जागा ही स्मारकासाठी आरक्षित आहे; तर उर्वरित अठरा गुंठे जागा ही तेथील लक्ष्मी ट्रस्टच्या नावे आहे. येथे पेशवे मंदिर उभारण्यासाठी या दोन्ही जागांचे आरक्षण सुधारित नियोजन आराखड्यात केल्याचे समजते. त्यासाठी ट्रस्टची जागा नगरपालिकेला ताब्यात घ्यावी लागणार आहे. ही जागा देण्याबाबत ट्रस्टची सहमती असल्याने या बैठकीला त्यांचे पदाधिकारीही उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com