महाराष्ट्र सुरक्षितच आहे - सुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

अंबाजोगाई - कुठलीही सुरक्षा नसताना राज्यात सर्वत्र दौरे करते. मला भीती वाटत नाही. एखादी चूक पोलिसांनी केली तर त्या यंत्रणेला दोष देऊ नये. महाराष्ट्र सुरक्षित असून, पोलिसांवर अविश्‍वास दाखवायला नको, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आज सकाळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युवा जागर संवाद’ कार्यक्रम झाला. त्या वेळी त्यांनी युवक- युवतींशी मनमोकळा संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे दिली. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया, प्राचार्या दीपा क्षीरसागर आदी होते. 

‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. आता देशात सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू आहे. महाराष्ट्रात प्रथम रोजगार हमी योजना सुरू झाली, आता केंद्र सरकारने ‘मनरेगा’च्या माध्यमातून ती देशभर सुरू केली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

युवकांनी मांडले विविध मुद्दे
आम्ही येथे ज्ञान घ्यायचे आणि बंगळूरला जाऊन नोकऱ्या का कराव्यात? ‘आयटी पार्क’ येथे उभारावे, अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, हुंड्यापेक्षा मुलीच्या शिक्षणावर खर्च करा आदी अनेक मुद्दे युवक-युवतींनी मांडले. त्यावर चर्चा झाली.

Web Title: marathwada news supriya sule Maharashtra is safe