पाच दिवसात तीनदा दिल्ली वारी; फडणवीसांच्या भाजप नेत्यांबरोबर बैठका

गेल्या पाच दिवसांत दोनदा दिल्ली, त्यानंतर गुजरात दौरे केले
Amit Shah-Devendra Fadnavis Meeting | BJP News
Amit Shah-Devendra Fadnavis Meeting | BJP NewsSakal

मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची काळजी वाढल्यानंतर भाजपच्या वर्तुळात बैठकाही वाढल्या असून, गेल्या पाच दिवसांत तीनदा दिल्ली, त्यानंतर गुजरात दौरे केलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री उशिरा पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी निघाले. मात्र, मुंबई विमानतळावरून ते परत आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर मात्र रविवारी सकाळपासून पुन्हा त्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर प्रमुख नेत्यांसोबत फडणवीस यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. (Amit Shah-Devendra Fadnavis Meeting)

बंडखोरांना कायदे दाखवून तांत्रिक बाबींत अडकविण्याच्या शिवसेनेच्या चाली हाणून पाडत, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची तयारी भाजप करीत असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे, पक्षाच्या वरिष्ठांसमवेत थेट बैठका, सत्ता स्थापनेची पूर्वतयारी, बंडखोरांवर आणि शिवसेनेच्या हालचालींवर नजर ठेवून, त्यावर मात करण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्या गोटात सुरू असल्याचे स्पष्ट आहे. दिल्ली, गुजरातसह अन्य बैठकांना हजेरी लावून फडणवीस हे शक्य तेवढा वेळ ''सागर''मध्येच बसून असतात.(Devendra Fadnavis News)

शिवसेनेतील फुटीचा अंदाज बांधून राज्यात भाजपचे सरकार येण्याच्या आशेने अनेक नेते फडणवीस यांच्या भेटीला येत आहेत. मात्र, बंडखोरीनंतर पहिले चार दिवस काहीसे शांत राहिलेले भाजप नेते आता पुन्हा सत्तानाट्यात उडी घेण्याची शक्यता आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी सकाळपासूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्या इतर प्रमुख नेत्यांची फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. हेच नेते दुपारी पुन्हा एकत्र आले.

कायद्याच्या पातळीवर बंडखोरांना धडा शिकविण्याची तयारी शिवसेनेत सुरू आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये धास्ती असल्याची चर्चा आहे. या बाबीचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी भाजपने नेतेही कायद्याच्या लढाईत पुढे आल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com