दुधाची नाकेबंदी; राज्यभरात 63 टँकर, दोन लाख लिटर दूध रोखले 

दुधाची नाकेबंदी; राज्यभरात 63 टँकर, दोन लाख लिटर दूध रोखले 

मुंबई : राज्यभरात रात्रीपासूनच सुरू झालेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईकडे येणारे 63 टॅकर व दोन लाख लिटर दुधाची नाकेबंदी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघठनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

आज दिवसभरात यामधे भर पडणार असून उद्या व परवा असे दोन दिवस मुंबई व परिसरात दुधाची टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. 

स्वाभिमानी संघठना पाच रूपये प्रति लिटर दरवाढी वर आग्रही असून दुधं बंदीचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, वैजापूर, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती व बुलढाणा या ठिकाणी मध्यरात्री पासूनच आंदोलनाला सुरूवात झाली. रात्री दुध घेऊन निघणारे खासगी व  सहकारी संस्थाचे टँकर आंदोलनकर्त्यांनी रोखून धरले.

यातील काही टॅंकर पेटवण्यात आले. काहींची तोडफोड केलीं. तर अनेक टँकरमधील दुध रस्त्यावर सोडून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com