एक कोटी सातबारा उताऱ्यांचे "ई-फेरफार' पूर्ण 

एक कोटी सातबारा उताऱ्यांचे "ई-फेरफार' पूर्ण 

मुंबई - राज्यातील शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाची प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर सुरू असून, एकूण 358 पैकी 357 तालुक्‍यांची माहिती "अपलोड' झाली आहे. आतापर्यंत एक कोटी 62 लाख 99 हजार 332 सर्व्हे क्रमांकांचे ई-फेरफार पूर्ण झाले आहेत. यात हिंगोली जिल्हा राज्यात आघाडीवर असून, इतर तेरा जिल्ह्यांत 90 टक्‍क्‍यांहून अधिक काम झाले असल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या मालमत्तेची बिनचूक माहिती त्यांना तत्काळ मिळावी, या हेतूने राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण व "ई-फेरफार' करण्यात येत आहे. राज्यात दोन कोटी 48 लाख 13 हजार 658 सर्व्हे क्रमांक असून त्यापैकी एक कोटी 62 लाख 99 हजार 332 सर्व्हे क्रमांकांचे "ई-फेरफार'चे काम पूर्ण झाले आहे. हिंगोली, गोंदिया, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशीम, भंडारा, जालना, लातूर, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, परभणी, नांदेड या 13 जिल्ह्यांमध्ये काम 90 ते 96 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाले आहे. नंदूरबार, नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, मुंबई उपनगर, वर्धा, नाशिक, कोल्हापूर, बीड, ठाणे, सोलापूर या 12 जिल्ह्यांमध्ये 70 ते 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम झाले आहे. 

हा सगळा डाटा महाभूलेख hhtp://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर नागपूर, वर्धा व नाशिक या तीन जिल्ह्यांतील डिजिटल स्वाक्षरी केलेले सातबारा उपलब्ध असून आपले सरकार या वेब पोर्टलवरूनही सातबारा घेता येतो. नागपूर व पालघर या जिल्ह्यात सातबारा वेंडिग यंत्रांवरून सातबारा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

"ई-फेरफार' आज्ञावलीमध्ये ऑनलाइन फेरफारचे 28 प्रकार आहेत. ऑनलाइनसाठी "अपलोड' केलेल्या डाटामधील त्रुटींची संख्या लक्षात घेता यासाठी नव्याने "एडिट मॉड्यूल' उपलब्ध करून दिले आहे. काही फेरफार संगणकात घेण्याचे राहून गेले असल्यास त्यासाठी "ऑनलाइन डाटा अपडेशन कोड'(ओडीयू) मोड्यूल देण्यात आले आहे. दररोज झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी "एमआयएस मॉड्यूल' डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. या मॉड्यूलचा वापर करून राज्यात आतापर्यंत 66 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

ई फेरफारसाठी... 
:- माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे 10 हजार 801 लॅपटॉप व 10 हजार 861 प्रिंटरची मागणी 
:- ई-फेरफार व ई-चावडी आज्ञावलीचा वापर करण्यासाठी 14 हजार 743 डिजिटल सिग्नेचर खरेदी 
- तहसीलदार, उपअधीक्षक भूमिअभिलेख व नगर भूमापन 741 कार्यालयांना "कनेक्‍टिव्हिटी' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com