'ईडी'च्या 11 तास चौकशीनंतर परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

 minister anil parab  first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics
minister anil parab first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics

मुंबई : एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेना पक्ष अडचणीत असताना शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची मंगळवारी तब्बल १० ते १२ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात सकाळी ११.२० च्या सुमारास पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. नुकतीच ही चौकशी संपली त्यांनंतर परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (minister anil parab first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics)

अनिल परब म्हणाले की, दापोलीचं रिसॉर्ट जे वारंवार मी सांगतोय की माझं नाहीये, बंद रिसॉर्टचं पाणी समुद्रात जातं त्या संदर्भात केंद्र सरकराच्या वतीने गुन्हा दाखल झाला आहे, त्याची चौकशी ईडी करतेय. त्याच्या संदर्भात ईडीच्या आधिकाऱ्यांनी आज दिवसभर मला प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत, यापूर्वीही दिली आहेत आणि यापुढे देखील देईल. मला विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे मी दिली आहेत असे त्यांनी सांगीतले. पुन्हा चौकशीला बोलवलं जाईल का या वर उत्तर देताना त्यांनी त्याबद्दल उद्या सकाळी कळेल असं सांगितलं.

 minister anil parab  first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics
शिवसेनेला अजून एक धक्का, आमदार यामिनी जाधव सुरतेत दाखल


दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ईडीचे समन्स आले आहे. यापूर्वी रिसॉर्टच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनच्या तरतुदींचे कथित उल्लंघन आणि मनीलॉण्डरिंग प्रकरणात अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. २६ मे रोजी ईडी अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या सात ठिकाणी छापे घातले होते.

 minister anil parab  first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics
..तर त्यांची आमदारकी रद्द होईल, राऊतांचा शिवसेना आमदारांना इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com