कामावर या, अन्यथा 6 महिन्यांचा पगार नाही- महाजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गैरहजर असल्याने निवासी डॉक्टरांच्या संपावरील याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मुंबई - डॉक्‍टरांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत सामूहिक रजा आंदोलन केल्याबद्दल निवासी डॉक्‍टरांना सरकारने इशारा देत आज (बुधवार) रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा सहा महिन्यांचा पगार मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की मार्डचे कामबंद केलेले डॉक्टर आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावर आले नाहीत, तर 6 महिन्याचा पगार कापला जाईल. डॉक्टरांना सुरक्षा देऊ, पण कामावर या. सध्या सरकारने नरमाईचे धोरण घेतले आहे. पण, कामावर नाही परतला तर पगार कापणे, मेस्मा लावणे हे करायला लावू नका.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गैरहजर असल्याने निवासी डॉक्टरांच्या संपावरील याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान नागपूरमध्ये 370, सोलापूरमध्ये 114 डॉक्‍टरांचे निलंबन करण्यात आले आहे.