‘नीट’मधून प्रवेशाच्या संधी

‘नीट’मधून प्रवेशाच्या संधी

दहावी - बारावीनंतर विद्यार्थ्यांपुढे महत्त्वाचा प्रश्न असतो - प्रवेश कोणत्या अभ्यासक्रमाला आणि कोठे घ्यायचा? त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून ताजी माहिती देणारे सदर.

देशभरात घेण्यात आलेल्या नीट २०१८ परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ४) जाहीर झाला. सीबीएसई बोर्डातर्फे ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्वांना नीट ऑल इंडिया रॅंक देण्यात येतो. प्रवेश प्रक्रिया मात्र वेगवेगळ्या यंत्रणांकडून राबविली जाते. प्रवेशाचे चार मार्ग पुढीलप्रमाणे ः

१५ टक्के ऑल इंडिया कोटा
देशभरातील फक्त शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखांतील १५ टक्के जागांवरील प्रवेश ‘नीट’मधील ऑल इंडिया रॅंकनुसार (एआयआर) होतात. एमबीबीएसच्या सुमारे १८१ महाविद्यालयांतून ३७०० जागा, तर बीडीएसच्या ३७ महाविद्यालयांतून ३३० जागा उपलब्ध होतात. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एकत्रित पसंतीक्रम भरून www.mcc.nic.in या संकेतस्थळावरून राबविली जाते. त्यासाठी लवकरच जाहीर होणाऱ्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करावी.

राज्यातील ८५ टक्के कोटा
महाराष्ट्रातील शासकीय, शासन अनुदानित, खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखांतील ८५ टक्के कोट्यातील प्रवेश ‘नीट’मधून होतात. याच प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील बीएएमएस व बीएचएमएस यासह उर्वरित शाखांचे प्रवेश दिले जातात. सर्वांची प्रवेश प्रक्रिया ‘डीएमईआर’तर्फे एकत्रित पसंतीक्रम नोंदवून राबविली जाते. राज्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून नावनोंदणी करून ऑल इंडिया रॅंकच्या आधारे राज्यातील मेरिट क्रमांकाचे वाटप केले जाते. सद्यःस्थितीत www.dmer.org या संकेतस्थळावर प्रवेशाचे माहितीपत्रक उपलब्ध असून, त्याचा अभ्यास करावा. लवकरच जाहीर होणाऱ्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करावी.

अभिमत विद्यापीठांमधील कोटा
देशभरातील सर्व अभिमत विद्यापीठांमधील एमबीबीएसच्या ४३ महाविद्यालयांतील ६२०० जागा व बीडीएसच्या ३४ महाविद्यालयांतील ३३०० जागा उपलब्ध आहेत. यापैकी ८५ टक्के कोट्यातील प्रवेश नीट ऑल इंडिया रॅंकनुसार होणार आहेत. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एकत्रित पसंतीक्रम भरून www.mcc.nic.in या संकेतस्थळावर सुरू होईल. नोटिफिकेशनची प्रतीक्षा करावी.

एएफएमसी प्रवेश
एएफएमसीची (आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज) प्रवेश क्षमता १३० असून प्रवेशासाठी www.mcc.nic.in या संकेतस्थळावरून नावनोंदणी करावी लागते. यादीतील गुणानुक्रमानुसार १५०० विद्यार्थ्यांची यादी एएफएमएसीकडे पाठविली जाते. त्यानंतर संस्थेतर्फे डोईलर टेस्ट, मुलाखत व वैद्यकीय तपासणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर होते.

सद्यःस्थितीत www.dmer.org आणि www.mcc.nic.in या संकेतस्थळाच्या संपर्कात राहा.
- हेमचंद्र शिंदे, बारामती (लेखक प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक आहेत)

(शब्दांकन - ज्ञानेश्वर रायते)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com