परिचारकांना बडतर्फ करावेच लागेल - धनंजय मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - देशातील सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत परिचारक यांना सभागृहातून बडतर्फ न करता केवळ निलंबनाची कारवाई करून सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी केला. याप्रकरणी चौकशीची घोषणा हा वेळकाढूपणा असून, सरकारला परिचारकांना वाचवायचे आहे, आम्ही हे होऊ देणार नाही, परिचारकांना बडतर्फ करावेच लागेल, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते मुंडे यांनी घेतली. 

या मुद्यामुळे विधान परिषदेचे कामकाज आज तिसऱ्या दिवशीही होऊ शकले नाही. सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले, की परिचारकांच्या वक्तव्यामुळे समाजात कमालीची चीड व संताप आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती सभागृहाची सदस्य असल्याने सभागृहाची प्रतिष्ठा घसरत आहे. परिचारकांना बडतर्फ न केल्यास कितीही गंभीर चूक केल्यानंतरही माफी मागून सुटता येते, असा चुकीचा संदेश जाण्याची शक्‍यता आहे. परिचारकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, चौकशीचे नाटक करून सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही मुंडे यांनी दिला.