परिचारकांच्या मुद्द्यावरून भाजपची आज कोंडी शक्‍य 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेल्या अत्यंत वादग्रस्त व अपमानकारक विधानाचे संतप्त प्रतिसाद उद्या (ता.7) विधिमंडळात उमटण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद आणि विधानसभेतही परिचारक यांच्या विरोधात सर्वपक्षीय आमदार एकत्र येणार असल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्‍यता आहे. परिचारक यांना आमदार पदावरून बडतर्फ करण्याची मागणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार असून, शिवसेनाही या मागणीचे समर्थन करण्याची शक्‍यता असल्यामुळे भाजप एकाकी पडण्याची शक्‍यता आहे. 

परिचारक यांचे विधान अत्यंत अपमानास्पद व सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणारे असल्याने राज्यभरात संतप्त भावना आहेत. आजी व माजी सैनिकांनीही विविध ठिकाणी निदर्शने करत परिचारक यांचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे सदस्य असताना असे बेताल विधान करणे, हा सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यापूर्वी राज्यसभेतून तीन खासदारांना अशाप्रकारे सभागृहाने बडतर्फ केल्याचा दाखलाही दिला जात आहे. उद्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी केवळ परिचारक यांच्या बडतर्फीचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची तयारी केल्याने अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Web Title: MLA prashant paricharak issue