आमदार कदम यांची  मुंबईला रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सोलापूर - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार रमेश कदम यांना आर्थिक गुन्हे शाखेने धडपड करून सोलापुरात आणले खरे, पण पोलिसांच्या हाती चौकशीदरम्यान ठोस असे काही लागले नाही. सोमवारी न्यायालयाने कदम यांची न्यायालयीन चौकशीत रवानगी केल्यानंतर त्यांना मुंबईकडे नेण्यात आले. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून 11 लाख 75 हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार कदम यांच्या मोहोळ येथील कार्यालयात काम करणाऱ्या सुनील बचुटे याने काढून घेऊन वाहन खरेदी केले होती. या गुन्ह्यात बचुटेसह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र

मुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने मंगळवारी (ता. 22)...

12.33 AM

पुणे - अर्धा पावसाळा झाल्यानंतरही निम्मा कोरडा राहिलेल्या महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली....

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017