दुष्काळी भागांत चांगला पाऊस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 जून 2016

राज्यातील पर्जन्यमान

  • 100 टक्‍के पाऊस : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, नांदेड
  • 76 ते 100 टक्‍के : रायगड, सोलापूर सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड
  • 51 ते 75 टक्‍के : नगर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती
  • 26 ते 50 टक्‍के : ठाणे, पुणे, जालना, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली
  • 0 ते 25 टक्‍के : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, चंद्रपूर

मुंबई : राज्यातील बहुतांश भागांत मॉन्सूनचे आगमन झाले असून, त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात एक जून ते 21 जून अखेर 65.2 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून, तो जूनच्या सरासरीच्या 41.7 टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या 93.1 टक्के एवढा झाला होता. मॉन्सूनने हजेरी लावलेली असली तरी त्यामध्ये सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

धरणांत नऊ टक्के साठा
सर्व प्रकल्पांत आज (ता. 21 जून) केवळ नऊ टक्के साठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच सुमारास 17 टक्के साठा होता.

विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे :
मराठवाडा- 1 टक्के (7), कोकण- 28 टक्के (30), नागपूर- 16 टक्के (20), अमरावती- 10 टक्के (25), नाशिक- 8 टक्के (15) आणि पुणे- 7 टक्के (19).