मॉन्सूनची मजल कर्नाटकपर्यंत

मॉन्सूनची मजल कर्नाटकपर्यंत

पुणे - अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी चाल दिल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत कर्नाटकपर्यंत मजल मारली. शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) मॉन्सून बंगालच्या उपसागरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह महाराष्ट्रात माॅन्सून ६ ते ८ जून या कालावधीत पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.  मॉन्सून यंदा तीन दिवस आगोदर केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे माॅन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली. कर्नाटकमधील शिरोली, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. 

विदर्भात उष्णतेची लाट
राज्यात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, शनिवारपासून (ता. २) पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com