मॉन्सून लवकरच अंदमानात येणार

मॉन्सून लवकरच अंदमानात येणार

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) प्रगतीस पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या ७२ तासांमध्ये माॅन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार अाहे, तर माॅन्सूनचे आगमन होताच अंदमानात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, शनिवारी अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत वेगवान वारे वाहणार आहे. साेमवारपासून (ता.२८) केरळसह पश्‍चिम किनाऱ्यावर मुसळधार पावसाची शक्यता अाहे. मासेमारीसाठी किनाऱ्यालगतच्या समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’ चक्रीवादळाने बुधवारी (ता. २३) सकाळी तीव्र रूप धारण केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंत हे वादळ अतितीव्र होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com