मोरारजींचा "भारतरत्न' परत घेण्यासाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना 1991 मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' मागे घ्यावा, या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने नकार दिला.

मोरारजी देसाईंनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच भारतरत्न व पद्म पुरस्कारांना विरोध केला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी वकील धनंजयसिंग जगताप यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.

मोरारजी देसाईंनी त्यांच्या "स्टोरी ऑफ माय लाइफ' या आत्मचरित्रात पद्म व भारतरत्न या पुरस्कारांना त्यांचा विरोध असल्याचे म्हटले आहे. या पुरस्कारांनी सन्मानित काही दिग्गजांनी त्याचा गैरवापर केल्याचेही आत्मचरित्रात नमूद आहे. याचाच आधार घेत याचिकाकर्त्या वकिलांनी देसाई दुटप्पी असल्याचे म्हणत भारतरत्न मागे घेण्याची मागणी केली. भारतरत्न व पद्म पुरस्कारांना विरोध करणाऱ्या व पंतप्रधानपद भूषवत असताना हे पुरस्कार स्थगित करणाऱ्या मोरारजी देसाईंनी 1991 मध्ये भारतरत्न व पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "निशान-ए-पाकिस्तान' स्वीकारला, असे म्हणत सरकारने त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले धनंजयसिंग जगताप यांनी केली आहे.

महाराष्ट्र

मुंबई - वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन...

03.39 AM

मुंबई - रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभरातील...

03.03 AM

मुंबई - महागाई, तीन वर्षांतील विक्रमी पेट्रोल दरवाढ आणि घरगुती सिलिंडरची दरवाढ या प्रश्‍नांवर आवाज उठवत सत्ताधारी भाजपची कोंडी...

02.48 AM