'लालपरी'ला वर्षाला पाचशे कोटींचा खड्डा 

ST bus
ST bus

सोलापूर : जोरदार पाऊस असो की उन्हाचा कडाका अथवा कडाक्‍याची थंडी..अशा विविध संकटांच्या खड्ड्यातून मार्ग काढत प्रवाशांना अहोरात्र सेवा देणारी "लालपरी' मागील पाच-सहा वर्षांपासून खडतर मार्गावरून प्रवास करत आहे. वार्षिक उत्पन्न सात हजार 200 कोटींचे आणि खर्च मात्र सात हजार 720 कोटी रुपयांचा होत असल्याने दरवर्षी 500 कोटी रुपयांचा खड्डा सहन करावा लागत असल्याची माहिती राज्य परिवहन विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

मागील कित्येक वर्षांपासून खेड्यापाड्यांना शहरांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलेल्या राज्य परिवहनची आर्थिक स्थिती सध्या बिघडली आहे. राज्यातील 90 टक्‍के गावांत एसटीची सेवा पोचली आहे. परंतु, खासगी वाहनांची संख्या वाढल्याने कित्येक लांब पल्ल्याच्या बसेस प्रवाशांविना अथवा कमी प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होतात. राज्यात खासगी वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.

त्यातच, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने तोट्यात आणखी वाढ झाल्याचे राज्य परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. शासकीय योजनांद्वारे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या 1200 कोटी रुपयांमधून कर्मचाऱ्यांचे वेतन भागविले जाते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तोट्यांमुळे नव्या बसची गरज असूनही जुन्या बस दुरुस्त करून वाहतूक सुरू असल्याचेही सांगण्यात आले. 

आकडे बोलतात... 
एकूण एसटी बस 
18,010 
वार्षिक उत्पन्न 
7,200 कोटी 
एकूण कर्मचारी 
1,05016 
वेतन खर्च 
3,150 कोटी 
डिझेलचा खर्च 
2,900 कोटी 
अन्य देखभाल-दुरुस्ती खर्च 
1,670 कोटी 
एकूण तूट 
520 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com