एसटीमध्ये शनिवारपासून होणार महाभरती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - एसटी महामंडळामध्ये आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या भरती प्रक्रियेला शनिवार (ता. 7) पासून प्रारंभ होणार आहे. चालक, वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक व पर्यवेक्षक अशा विविध विभागांतील 14 हजार जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. 

मुंबई - एसटी महामंडळामध्ये आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या भरती प्रक्रियेला शनिवार (ता. 7) पासून प्रारंभ होणार आहे. चालक, वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक व पर्यवेक्षक अशा विविध विभागांतील 14 हजार जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. 

एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक, सहायक (मॅकेनिकल) व पर्यवेक्षकाची अनेक पदे रिक्त आहेत. विशेषता कोकणात चालक-वाहकांची अधिक कमतरता आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्याच्या सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार कोकणातील सहा विभागांत (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे व पालघर) साठी 7 हजार 923 चालक व वाहकांची भरती करण्यात येणार आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये 2 हजार 548 लिपिक, 3 हजार 293 सहायक आणि 483 पर्यवेक्षकांची भरती भविष्यात करण्यात येणार आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात सात जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. येत्या 12 जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारी ही असणार आहे. उमेदवाराला अर्जातील चुकीची माहिती बदलण्याची मुभा महामंडळाने दिली आहे. चुकून राहून गेलेली अथवा चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आलेली आहे. 

टॅग्स

महाराष्ट्र

मुंबई : आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत...

03.42 PM

नाशिक : कोपर्डीतील सामुहिक अत्याचार व खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी विशेष सरकारी वकिलांची साक्ष घेण्याविषयी केलेली याचिका...

01.57 PM

मुंबई : काँग्रेस सोडून ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. अशा दलबदलू लोकांची पक्षाला गरज नाही. असे संधिसाधू पक्षांतर करीत...

10.54 AM