नौकानयन मार्गातील गाळ काढणार - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - सरकारच्या सागरमाला प्रकल्पातून खाडीतील नौकानयन मार्गातील गाळ काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. 

सदस्य मनीषा चौधरी यांनी सातपाटी खाडीतील नौकानयन मार्गातील साचलेला गाळ काढण्याच्या मागणीसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. 

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, भरतीच्या वेळी मच्छीमारांची गैरसोय होत नाही, पण ओहोटीच्या वेळी त्रास होतो. सातपाटी येथील गाळ उपसण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. 

केंद्राच्या सागरमाला प्रकल्पातून बंदर उभारणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. ड्रेझिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने अशा नौकानयन मार्गातील गाळ काढण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. त्यासाठी केंद्राची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.