भारतात पाल्याच्या शिक्षणावर सरासरी १२ लाख खर्च

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

जागतिक सरासरीच्या तुलनेत प्रमाण कमी; हाँगकाँग आघाडीवर

मुंबई - भारतीय पालक पाल्यांच्या प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणावर सरासरी १२.२२ लाख रुपये (१८,९०९ डॉलर) खर्च करत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. जागतिक सरासरीच्या प्रमाणामध्ये शिक्षणावर खर्च करण्याचे भारतीयांचे प्रमाण कमी आहे. शिक्षणावर खर्च करण्याची जागतिक सरासरी २८,५८००० (४४,२२१ डॉलर) इतकी आहे.

जागतिक सरासरीच्या तुलनेत प्रमाण कमी; हाँगकाँग आघाडीवर

मुंबई - भारतीय पालक पाल्यांच्या प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणावर सरासरी १२.२२ लाख रुपये (१८,९०९ डॉलर) खर्च करत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. जागतिक सरासरीच्या प्रमाणामध्ये शिक्षणावर खर्च करण्याचे भारतीयांचे प्रमाण कमी आहे. शिक्षणावर खर्च करण्याची जागतिक सरासरी २८,५८००० (४४,२२१ डॉलर) इतकी आहे.

याबाबत ‘एचएसबीसी’ने ‘शिक्षणाच्या मूल्या’संदर्भात संशोधन केले असून, यामध्ये शिक्षणावरील खर्चाचे प्रमाण दर्शविण्यात आले आहे. ‘‘भारतीय पालक मुलांच्या प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीपर्यंत १२ लाख २२ हजारांपर्यंत खर्च करत असतात. या खर्चामध्ये विद्यापीठांचे शिक्षण शुल्क, पुस्तके, वाहतूक व निवास खर्च आदींचा समावेश होतो. हाँगकाँगमधील पालक मुलांच्या शिक्षणावर सर्वाधिक १ लाख ३२ हजार १६१ डॉलर खर्च करतात. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये ९९ हजार ३७८ डॉलर पाल्यांच्या शिक्षणावर खर्च केले जातात. सिंगापूरमध्येही पाल्यांच्या शिक्षणावर ७० हजार ९३९ डॉलर खर्च केले जातात.

शिक्षणाच्या मूल्यासंदर्भात एचएसबीसीने १५ देश व प्रांतांमधील ८ हजार ४८१ पालकांची मते जाणून घेतली. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, इजिप्त, फ्रान्स, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, मेक्‍सिको, सिंगापूर, तैवान, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये या संदर्भातील संशोधन सर्वेक्षण करण्यात आले. 

भारतीय पालकांमधील १० पैकी ९ पालक (९४%) मुलांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा विचार करतात, तर ७९ टक्के पालक पाल्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी योगदान देत असतात. भारतामधील पालकांना पदव्युत्तर पदवीमुळे आपल्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, अशी आशा असते, असेही या सर्व्हेक्षणामध्ये समोर आले आहे. भारतामधील अनेक पालक मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या इच्छांना मुरड घालतात, असेही या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.

पालकांच्या शिक्षणावर खर्च करण्याच्या पद्धती

५९ टक्के साधारण उत्पनातून 

४८ टक्के बचतीतून

३० टक्के गुंतवणूक अथवा विमा

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिक व्यासपीठावर शिक्षण महत्त्वाचे आहेच. पालकांनाही हे मान्य असून, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते वेळ व पैसा खर्च करत असतात. ते आपल्या पाल्यांना सर्वतोपरी साहाय्य करत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये याची काळजी घेत असतात, वेळप्रसंगी स्वत: काही गोष्टींचा त्याग करतात.
- एस. रामकृष्णन, बॅंकिंग व मालमत्ता व्यवस्थापन विभागप्रमुख, ‘एचएसबीसी’