सालेमच्या शिक्षेचा निर्णय 22 ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबईत 1993मध्ये झालेल्या बॉंबस्फोट मालिकेच्या "ब' खटल्यात दोषी ठरविण्यात आलेला कुख्यात गुंड अबू सालेम याच्यासह पाच जणांच्या शिक्षेच्या स्वरूपावर टाडा न्यायालय 22 ऑगस्टला निर्णय देण्याची शक्‍यता आहे. या खटल्यात न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा, करीमुला खान, रियाझ सिद्दीकी, ताहीर मर्चंट व फिरोज खान यांना कट रचणे; तसेच कटाच्या अंमलबजावणीत सहभाग असल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यापैकी डोसाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. पोर्तुगालशी झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार, सालेमला फाशीची शिक्षा सुनावणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली आहे.