सहकारी दूध संघांवर कारवाई करणार - जानकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई - दूध उत्पादकांसाठी सरकारने 21 जून 2017 पासून तीन रुपये प्रतिलिटर दरवाढ लागू केली होती. परंतु अद्यापही काही सहकारी दूध संघांनी दरवाढ लागू केलेली नाही. सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

जानकर म्हणाले, की 21 जून 2017 पासून गायीचे दूध 27, तर म्हशीचे दूध 36 रुपये प्रतिलिटर अशी एकूण तीन रुपयांची वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे याचा ग्राहकांवर बोजा पडणार नव्हता. तरी देखील काही दूध उत्पादक संघांनी ही दरवाढ अद्याप लागू केली नाही. यापूर्वीही अशा दूध संघांना नोटिसा पाठविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दूध संघांमध्ये बीड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा समावेश असल्याचे जानकर यांनी सांगितले.