खडसेंविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनुसार माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपासासाठी हे प्रकरण जळगावमध्ये वर्ग करण्यात आले आहे.

खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 2) जळगावमधील मुक्ताईनगर येथे कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात खडसेंनी तुमच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती एका महिलेने दमानिया यांना दिली. खडसेंनी लज्जास्पद वक्तव्य केल्याचा दावा करत दमानिया यांनी बुधवारी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या कार्यक्रमाचा अहवाल वाकोला पोलिसांकडे नव्हता. तो मिळवून पाहिल्यानंतर पोलिसांनी खडसेंविरोधात कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, खडसे यांनी अनेक सभांमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे दमानिया यांनी सांगितले.