महामार्गावरील खड्डे बुजविणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज येथे सांगितले. ते मंत्रालयात बोलत होते. वायकर यांनी गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या पाहणीत राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडल्याचे त्यांना दिसून आले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. ते बुजवण्याचे आदेश त्यांनी दिले.