खडसे समर्थकांचा भाजपविरोधी सूर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 मे 2017

पनवेल महापालिकेत शेकापला मतदानाचे आवाहन
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर राजकीय अन्याय झाल्याची सुप्त भावना आता उघड होऊ लागली आहे. खानदेशचा नेता, अशी ओळख असलेल्या नाथाभाऊंचे समर्थक उघडपणे भाजपविरोधी सूर लावत असल्याचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.

पनवेल महापालिकेत शेकापला मतदानाचे आवाहन
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर राजकीय अन्याय झाल्याची सुप्त भावना आता उघड होऊ लागली आहे. खानदेशचा नेता, अशी ओळख असलेल्या नाथाभाऊंचे समर्थक उघडपणे भाजपविरोधी सूर लावत असल्याचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.

रायगड जिल्हा खानदेश मंडळाने एकनाथ खडसे यांच्या फोटोसह शेतकरी कामगार पक्षाला मतदान करा, असे आवाहन करणारे पत्रक काढल्याने भाजप नेते अचंबित झाले आहेत. या पत्रकात थेटपणे म्हटले आहे, की नाथाभाऊंचे समर्थक खानदेशवासीयांची एकच बात, पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी देऊ कपबशीला साथ'. नाथाभाऊंना आहे विश्‍वास, कपबशीच करेल पनवेलचा विकास..! अशा शब्दांत खानदेश रहिवासी मित्र मंडळाने थेट भाजपलाच आव्हान दिले आहे.

मुंबई परिसरातील कल्याण- डोंबिवली व पनवेल भागांत खानदेशातील नागरिकांची संख्या मोठी आहे. यातले बहुतांश नागरिक हे एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. कल्याण- डोंबिवली महापालिकेत भाजपच्या वाढलेल्या जागांमध्ये या खानदेशातील नागरिकांचा सहभाग मोठा होता. त्या वेळीही खडसे यांच्या चमत्कारामुळेच कल्याण- डोंबिवलीत भाजपला यश मिळाल्याचे त्यांचे समर्थक म्हणत होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर राजकीय अन्याय झाल्याची भावना आता हळूहळू तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागले, त्याला 5 जून रोजी एक वर्ष होत आहे. मात्र अद्याप या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नसल्याने त्यांचा मंत्रिमंडळातला पुनःप्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. नुकतेच पार पडलेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात खडसे यांनी "बाहुबलीला कटप्पाने का मारले..?' असा सवाल करत राजकीय कोटी केली होती. आता तर त्यांच्या समर्थकांनी थेट भाजपविरोधी मतदानाचा सूर आळवल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र

कुडाळ : तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि...

04.27 PM

मुंबई : 'हगलेलं तरंगत' ही आपल्याकडे गावरान म्हण आहे. कितीही खोटं बोलला तरी ते पुढे येणार आहे. सोशल मिडीयात काही लपून राहत नाही....

01.18 PM

मुंबई  - ज्या सोशल मीडियाच्या शिडीवरून भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता काबीज केली, तोच सोशल मीडिया भाजपसाठी कर्दनकाळ...

07.52 AM