मराठा आंदोलकांनी चर्चेला यावे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा मोर्चातील आंदोलकांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. आरक्षणाचा विषय न्यायालयाच्या कक्षात येतो, त्यामुळे मराठा आंदोलकांनी चर्चेला पुन्हा एकदा पुढे यावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले. शिष्यवृत्तीसाठी अण्णासाहेब पाटील योजना, मागासवर्ग आयोगाकडे आरक्षणाचा मुद्दा वर्ग करणे अशा सर्व विषयांवर या वेळी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे ते म्हणाले. भाजपतील ज्या आमदारांना मोर्चात सहभागी व्हायचे आहे ते जाऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.