राज्यात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

प्रमुख शहरांमध्ये दोन दिवस पाहणी
मुंबई - राज्यात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण मुंबईत आढळून आले आहे. त्याखालोखाल पुणे येथील हडपसर आणि चंद्रपूरमधील जटपुरा यांचा क्रमांक लागतो.

प्रमुख शहरांमध्ये दोन दिवस पाहणी
मुंबई - राज्यात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण मुंबईत आढळून आले आहे. त्याखालोखाल पुणे येथील हडपसर आणि चंद्रपूरमधील जटपुरा यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ध्वनिप्रदूषणाचा प्रभाव तपासण्याकरिता प्रमुख शहरांमध्ये सलग दोन दिवस 48 तास "परिसर ध्वनिस्तर संनियंत्रण कार्यक्रम' दरवर्षी राबवला जातो. यापैकी एक कामकाजाचा व एक सुटीचा दिवस होता. राज्यातील निवडक निवासी क्षेत्रातील दिवसाचे व रात्रीचे ध्वनिस्तर मोजण्यात आले. मुंबईत वाशी नाका- चेंबूर येथे सर्वाधिक ध्वनिप्रदूषण आढळून आले. त्याखालोखाल शिवाजी पार्क- दादर व त्यानंतर पुणे- हडपसर आणि चंद्रपूर शहरात सर्वांत जास्त ध्वनिप्रदूषण आढळून आले.

ध्वनिस्तराचे प्रमाण (डेसिबल)
ठिकाण सुटीचा दिवस कामकाजाचा दिवस
दिवस रात्र दिवस रात्र

मुंबई- शिवाजी पार्क- दादर 80.2 76.9 88.2 79.3
मुंबई- वाशी नाका- चेंबूर 83.5 77.3 89.2 89.4
ठाणे (गोखले रोड) 83.9 92.9 82.3 71.7
ठाणे (वागळे इस्टेट) 83.9 92.9 82.3 71.7
पुणे (स्वारगेट) 80.2 64.3 81.9 81.9
पुणे (हडपसर) 77.3 62.5 82.8 82.8
नाशिक (द्वारका सर्कल) 79.6 70.1 79.4 69.5
नाशिक (उद्योग भवन, सातपूर) 71.9 68.4 73.5 67.8
औरंगाबाद (निराला बाजार) 73.7 63.5 79.6 64.8
नांदेड- वाघेला (विष्णुपुरी) 76.7 58.2 77.4 68.3
नागपूर (सीताबर्डी पोलिस
ठाण्याजवळ) 76.7 69.5 78.1 74.6
चंद्रपूर (जटपुरा गेट) 75.2 71.0 89.0 77.4
अमरावती (राजकमल चौक) 84.2 66.5 80.9 68.4
अकोला (जिल्हाधिकारी
कार्यालय) 75.5 58.7 77.0 58.3