मंत्रालयात सोमवारी ऑनलाइन लोकशाही दिन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (ता.10) सकाळी 11 वाजता, मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्ष येथे ऑनलाइन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. लोकशाहीदिनी ज्या अर्जदारांनी नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्‍यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे, अशा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाहीदिनी मुख्यमंत्री यांच्यासमक्ष निवेदन मांडण्याकरिता प्रवेश देण्यात येईल.